गुरु अर्जुन प्रतिष्ठानच्यावतीने कामोद खराडे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:57+5:302021-04-02T04:21:57+5:30

अहमदनगर : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा फिल्मफेअर ॲवाॅर्ड नगरचे कलाकार कामोद खराडे यांना जाहीर झाला आहे. ...

Kamod Kharade felicitated on behalf of Guru Arjun Pratishthan | गुरु अर्जुन प्रतिष्ठानच्यावतीने कामोद खराडे यांचा सत्कार

गुरु अर्जुन प्रतिष्ठानच्यावतीने कामोद खराडे यांचा सत्कार

अहमदनगर : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा फिल्मफेअर ॲवाॅर्ड नगरचे कलाकार कामोद खराडे यांना जाहीर झाला आहे. याबद्दल गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी ‘थप्पड’ या हिंदी चित्रपटासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनला फिल्मफेअर ॲवाॅर्ड मिळाला आहे.

या छोटेखानी सत्कार कार्यक्रमात श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, जनक आहुजा, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या हस्ते खराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मुनोत, जय रंगलानी, मनयोग माखीजा, संतोष बडे, संजय वाळूंज, संगीत प्रशिक्षक अजितसिंग वधवा, डॉ. गलांडे, प्रमोद जगताप, प्रितम गायकवाड, शुभम शेरकर, जस्मित वधवा, सीमर वधवा, अनिरुध्द देशमुख, मोहसीन सय्यद, स्वराज गुजर, ओमकार पाटसकर आदी उपस्थित होते.

खराडे हे नगर येथील कलाकार असून, २००४ पासून ते ध्वनी डिझाइनर आणि ध्वनी अभियंता म्हणून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटाचे ध्वनी डिझाईन केले आहे. सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर फिल्मफेअर ॲवाॅर्ड मिळवणारे ते नगरचे दुसरे कलाकार ठरले आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नगरचे नाव उंचावले असल्याची भावना हरजितसिंह वधवा यांनी व्यक्त केली. पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके म्हणाले, नगरच्या मातीत अनेक कलाकाररुपी हिरे दडलेले आहेत. जिल्ह्याच्या शिरपेचात या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाहुण्यांचे स्वागत संगीत प्रशिक्षक अजितसिंग वधवा यांनी केले. जनक आहुजा यांनी खराडे यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कामोद खराडे यांनी फिल्म इंडस्ट्रीजमधील अनेक पैलूंचा उलगडा करून संगीत व ध्वनी डिझाईनबद्दल माहिती दिली.

---

फोटो- ०१ कामोद खराडे

नगरचे कलाकार असलेले कामोद खराडे यांना थप्पड चित्रपटाच्या ध्वनी डिझाईनला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करताना श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके. समवेत जनक आहुजा व सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा आदी.

Web Title: Kamod Kharade felicitated on behalf of Guru Arjun Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.