मिरीच्या सरपंचपदी कमल सोलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:47+5:302021-02-11T04:22:47+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या गटाच्या कमल तुकाराम सोलाट यांची सरपंचपदी तर ...

Kamal Solat as Sarpanch of Miri | मिरीच्या सरपंचपदी कमल सोलाट

मिरीच्या सरपंचपदी कमल सोलाट

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या गटाच्या कमल तुकाराम सोलाट यांची सरपंचपदी तर ॲड. अरुण बलभीम बनकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू पालवे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत कमल सोलाट यांनी सरपंचपदासाठी तर अरुण बनकर यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला होता. या निवडीदरम्यान संजय रघुनाथ शिंदे, संभाजी एकनाथ झाडे, सुनंदा राहुल गवळी, सुभाष एकनाथ गवळी, अनिता जालिंदर गवळी, अनिता विजय गुंड हे गवळी गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राजू शेख, पिंटू वाघ ,विजय गुंड, आदिनाथ सोलाट, नारायण सोलाट, विष्णू सोलाट, बंडू झाडे, जयदीप गवळी, संजू भाऊ डोळसे, नंदू बनकर, बाबासाहेब निमसे आदी उपस्थित होते.

Web Title: Kamal Solat as Sarpanch of Miri