कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुपालक मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:32+5:302021-02-05T06:42:32+5:30
तळेगाव दिघे : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व संगमनेर पंचायत समिती पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दिघे येथे ...

कामधेनु दत्तक ग्राम योजना पशुपालक मेळावा उत्साहात
तळेगाव दिघे : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व संगमनेर पंचायत समिती पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दिघे येथे कामधेनु दत्तक ग्राम योजनेंतर्गत पशुपालक मेळावा व प्रात्यक्षिक शिबिर उत्साहात पार पडले.
तळेगाव दिघे येथे मेळावा व प्रात्यक्षिक शिबिराचे दीपप्रज्वलन पंचायत समितीच्या सदस्य आशाताई इल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, सोपान दिघे, पंढरीनाथ इल्हे, मच्छिंद्र दिघे, काशीनाथ जगताप, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शिवाजी फड, डॉ. पोखरकर डॉ. सुनील भागवत, नंदकुमार दिघे, भाऊसाहेब दिघे, वेणुनाथ दिघे उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सर्वाधिक दूध उत्पादन घेणाऱ्या पशुपालकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पशुपालकांना निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
...
फोटो : २५तळेगाव पशुपालक
...
तळेगाव दिघे येथे कामधेनु दत्तक ग्राम योजनेंतर्गत निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक पशुपालकांना करून दाखविताना पशुसंवर्धन विभागाचे डॉ.पोखरकर आदी.