शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

साईनगरीत काल्याचे कीर्तन झाले, पण भाविक नाही आले; गुरूपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 16:53 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईनगरीतील ११२ व्या गुरूपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सोमवारी (दि.६ जुलै) सांगता करण्यात आली.

शिर्डी : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईनगरीतील ११२ व्या गुरूपौर्णिमा उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सोमवारी (दि.६ जुलै) सांगता करण्यात आली.सोमवारी सकाळी काकड आरतीनंतर संस्थानचे पुजारी विलास जोशी यांनी समाधी मंदिरात सपत्नीक पाद्यपूजा केली. त्यानंतर पुजारी चंद्रकांत बोरकर यांनी गुरूस्थान मंदिरात सपत्नीक रूद्राभिषेक पूजा केली. सकाळी दहा वाजता समाधी मंदिरात पुजारी उल्हास वाळुंज यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते परंपरेनुसार दहीहंडी फोडण्यात येऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पर्यवेक्षक रामदास कोकणे, तुरकणे आदी उपस्थित होते.दोन महिन्यापूर्वी कोरोना लॉकडाऊनमधील रामनवमी उत्सव व १९४२ सालातील कॉलरामुळे बंद ठेवण्यात आलेला रामनवमी उत्सव वगळता साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सव प्रथमच भाविकांच्या अनुपस्थितीत पुजाऱ्यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. पालखी व रथ मिरवणुकीसारख्या मंदिराबाहेरील कार्यक्रमांनाही कात्री लावण्यात आली. एरवी उत्सवात गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, पदयात्री-पालख्यांतील भाविकांकडून होत असलेला साईनामाचा गजर, ढोल-ताशांचे आवाज, पालखी समोरील पारंपरिक नृत्य, रथ मिरवणुकीसाठीची अलोट गर्दी, मंदिर व परिसरात होणारी आनंदाची उधळण, भाविकांकडून गुरूदक्षिणा म्हणून बाबांना अर्पण करण्यात येणाºया सोने-चांदीच्या वस्तू, उत्सवानिमित्त प्रसादालयातील तीन दिवसांचे मिष्टान्न भोजन आदी बाबींना यंदा भाविक पारखे झाले.

विश्वस्तांची अनुपस्थिती

संस्थानच्या अधिकाऱ्यांनी पुजारी व कर्मचाºयांच्या हातून करवून घेतलेले विविध धार्मिक विधी, कोविड योद्ध्यांना साईसच्चरित्र पारायणात ग्रंथ वाचनाची संधी दिली. आर्थिक मंदीतही भाविकांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर हीच काय ती यंदाच्या उत्सवाची वैशिष्ट्ये होती. एकूणच यंदाचा गुरूपौर्णिमा उत्सव ऐतिहासिक ठरला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी