कारच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी, श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावरील घटना
By शिवाजी पवार | Updated: May 10, 2023 17:09 IST2023-05-10T17:08:21+5:302023-05-10T17:09:42+5:30
श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावर एकरुखे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. एका अज्ञात कारच्या धडकेने काळवीटाचा जागीच मृत्यू झाला.

कारच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी, श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावरील घटना
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावर एक रात्रीच्या वेळी कारच्या धडकेत एका काळवीटाचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावर एकरुखे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. एका अज्ञात कारच्या धडकेने काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. काळवीट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोकळे रान आहे. येथे हरणांचे मोठे कळप अनेकदा दिसून येतात. रात्रीच्या वेळी शांतता पसरताच हे कळप रस्ता ओलांडून जातात. त्यातून अशा घटना घडतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे