काजल पदाडे हिस सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:34+5:302021-01-08T05:04:34+5:30

कोपरगाव : शहरातील सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विज्ञान शाखेतील पदार्थ विज्ञान वर्गातील काजल बाजीराव पदाडे या विद्यार्थिनीस एप्रिल-मे २०१९ ...

Kajal Padade His Gold Medal | काजल पदाडे हिस सुवर्णपदक

काजल पदाडे हिस सुवर्णपदक

कोपरगाव : शहरातील सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विज्ञान शाखेतील पदार्थ विज्ञान वर्गातील काजल बाजीराव पदाडे या विद्यार्थिनीस एप्रिल-मे २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये सुर्वणपदक प्राप्‍त झाले आहे.

सदर पुरस्‍कार हा पुरुषोत्तम नारायण भोगाटे सुवर्णपदक, स्व.प्राचार्य रॅंग्लर गोपीकृष्णन लक्ष्मण चंद्रात्रे सुवर्णपदक व विद्यावाचस्पती अभ्यंकर यांच्‍या नावाने पदार्थ विज्ञान या विषयातून प्रथम येणा‌‌-या विद्यार्थ्‍यास दरवर्षी दिला जातो. सदर पुरस्‍कार मिळाल्‍याचे अधिकृत पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्‍त झाले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ. बी. बी. भोसले यांनी येथे दिली. काजल हिचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, डॉ. आर. के. कोल्हे व सर्व सहकारी प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.

........

फोटो-०६- काजल पदाडे

060121\img-20210102-wa0058.jpg

फोटो०५- काजल पदाडे, कोपरगाव 

Web Title: Kajal Padade His Gold Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.