वडुले जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कैलास पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST2021-09-13T04:21:02+5:302021-09-13T04:21:02+5:30

कुकाणा : वडुले (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास पवार, तर उपाध्यक्ष म्हणून संभाजी ...

Kailash Pawar as the Chairman of Vadule Zilla Parishad School Management Committee | वडुले जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कैलास पवार

वडुले जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कैलास पवार

कुकाणा : वडुले (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास पवार, तर उपाध्यक्ष म्हणून संभाजी पवार यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पालक-शिक्षक बैठकीत मुख्याध्यापक एकनाथ राव यांनी निवडीची सूचना केली. अध्यापक संजय कातोरे यांनी समिती निवडीच्या निकषांबाबत मार्गदर्शन केले. सर्वांनुमते पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्षपदी कैलास पवार, तर उपाध्यक्ष संभाजी पवार व मीना लकडे, मुक्ता कनगरे, आशा लेंभे, माया सरोदे, रावसाहेब गर्जे, रवींद्र गर्जे, जया गर्जे, सावित्रा भागवत, संतोष ढोकणे, सरपंच प्रतिनिधी दिनकर गर्जे, शिक्षणतज्ज्ञ बाबासाहेब आतकरे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष साहेबराव गर्जे, ज्ञानेश्वर देवढे, विठ्ठल नरोटे, चिमाभाऊ लेंभे, बाबासाहेब नरोटे, नंदू गर्जे, वसंत कोरडे, ग्रामपंचायत सदस्य कडूबाई सरोदे, गणेश शिलेदार, रावसाहेब सरोदे, गणपत लेंभे, महादेव भिसे, लक्ष्मण पंडित, बाबा लकडे, विमल सरोदे, कमल गर्जे, मार्कस सरोदे, साखरबाई गर्जे, पंढरीनाथ सरोदे, काशीनाथ भागवत, देवीदास सरोदे, बाळासाहेब पवार, सेवा संस्थेचे सचिव एस. ए. देवढे, एकनाथ माळी, अध्यापिका भवानी बिरू, अपर्णा पन्हाळे, संगीता बोऱ्हुडे, आदी उपस्थित होते. अध्यापक पंडित राठोड यांनी आभार मानले.

---

१२ वडुले

वडुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करताना सरपंच दिनकरराव गर्जे व ग्रामस्थ.

Web Title: Kailash Pawar as the Chairman of Vadule Zilla Parishad School Management Committee