शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड, खर्डा शहरात कडकडीत बंद

By admin | Updated: August 31, 2016 00:33 IST

जामखेड/खर्डा: जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडसह खर्डा व इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

जामखेड/खर्डा: जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडसह खर्डा व इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.मंगळवारी कडकडीत बंद पाळून जामखेडकरांनी घटनेचा निषेध नोंदविला. तहसील कार्यालया समोरील निषेध सभेत भाजप कार्यकर्त्यांनी निरपराध कार्यकर्त्यांची नावे वगळण्याची मागणी केली. सभापती डॉ. मुरूमकर यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपने जामखेड शहरसह तालुका बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार एस. टी. बस स्थानकापासून भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. व्यापारी, उद्योजक, छोटे मोठे व्यावसायिक यांना बंदचे आवाहन करून तहसील कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी विरोधकांनी खोटे गुन्हे दाखल करून भाजप कार्यकर्त्यांना टार्गेट केल्याचा आरोप केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या खर्डा बंदला मंगळवारी प्रतिसाद मिळाला.४भाजप शहराध्यक्ष संजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शिवकुमार गुळवे, उपसरपंच भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य संजय गोपाळघरे, बापूसाहेब ढगे, विकास शिंदे, नितीन सुरवसे, बबलू सुरवसे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या बंदला ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आपले दुकाने बंद ठेऊन सहभाग नोंदविला. पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग पाहता दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून आपले व्यवहार सुरळीत करण्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळे दुपारनंतर खर्डा शहरातील दुकाने उघडून व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याची खरेदी करणे शक्य झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाजप कार्यकर्त्यांनी जामखेडच्या तहसीलदारांना निवेदन निषेध नोंदविला.