दहिगावने परिसरात जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:26+5:302021-04-15T04:19:26+5:30

भावीनिमगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर शिरसाठ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातील समाज ...

Jubilee celebrations in Dahigaon area | दहिगावने परिसरात जयंती उत्साहात

दहिगावने परिसरात जयंती उत्साहात

भावीनिमगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर शिरसाठ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गावातील समाज मंदिरात भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच सदाशिव जाधव, शाम शिरसाठ, सदस्य बंडू तोरमड, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जोशी, संदीप शेळके, संतोष ओहोळे, सावळेराम काळे, बाबासाहेब पंडित, ज्ञानेश्वर क्षीरसागर, मानीयल पंडित, अनिस पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दहिगावने येथील भीमशक्ती युवा मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, जहागीर शेख, मेजर संतोष घुले, सुरेश घानमोडे, दिलदार शेख, विकास कसबे, बाबा कसबे, किशोर कांबळे, मेजर किशोर कसबे, पांडुरंग खंडागळे, विशाल कांबळे, सचिन खंडागळे, प्रवीण कांबळे, प्रशांत कसबे, लखन नाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - १४ दहिगावने

भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Jubilee celebrations in Dahigaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.