उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये जल्लोष

By साहेबराव नरसाळे | Updated: July 2, 2023 19:56 IST2023-07-02T19:56:36+5:302023-07-02T19:56:50+5:30

रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडून भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला.

Jubilation in Ahmednagar as Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister | उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये जल्लोष

उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेताच अहमदनगरमध्ये जल्लोष

अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 

रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडून भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला. यात पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावर संधी देण्यात आली. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटासोबत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर फटाके फोडून पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी सुरेश बनसोडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, कवाडे गटचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, पप्पु पाटील, अमोल जाधव, वैभव साळुंके, सचिन कसबे, राहुल सोनटक्के, अक्षय बोरूडे, धम्मा गायकवाड, तेजस गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले, आज जो मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला असून यामध्ये उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप देखील त्यांच्याबरोबर असून कार्यकर्त्यांचा पक्ष फक्त आमदार संग्राम जगताप असून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहणार आहेत. पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे अहमदनगर शहरातील विकास कामे पुन्हा एकदा जलद गतीने सुरू होणार असल्याची भावना बनसोडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Jubilation in Ahmednagar as Ajit Pawar took oath as Deputy Chief Minister