शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीचे क्षेत्र निम्म्याने घटले

By admin | Updated: December 23, 2015 23:25 IST

केडगाव : रब्बीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्वारी पिकाचे मोठे आगार असलेल्या नगर तालुक्यात कमी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होणार

केडगाव : रब्बीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ज्वारी पिकाचे मोठे आगार असलेल्या नगर तालुक्यात कमी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होणार असून, यंदा गव्हाच्या पेरण्याच झाल्या नाहीत.नगर तालुक्यात जवळपास ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. अवर्षणप्रवण क्षेत्रात येणारा व कमी पर्जन्यमानामुळे रब्बीचा तालुका म्हणून नगर तालुक्याची ओळख आहे. त्यातही ज्वारीचे लाखो हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. ज्वारीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे आगार असूनही यावर्षी मात्र पावसाने दगाफटका केल्याने ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. एक-दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, ज्वारीचे शिवार बहरले आहे. वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, राळेगण म्हसोबा, वडगाव-तांदळी या वाळकी गटातील गावांमध्ये मात्र पाऊस नसल्याने या भागातील ज्वारीचे रान ओसाड आहे. हीच परिस्थिती चिचोंडी पाटील गटात येणाऱ्या गावांची आहे. या भागातही समाधानकारक पाऊस नसल्याने ज्वारीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. निंबळक, खारेकर्जुने, नेप्ती, जखणगाव आदी भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने तेथील कसदार जमिनींमध्ये ज्वारीची पिके आता कणसावर येऊ लागली आहेत. चास, कामरगाव या पट्ट्यातही पावसाने थोडीफार कृपादृष्टी दाखवल्याने ज्वारीचे शिवार बहरत आहे. सध्या आभाळी वातावरण असल्याने ज्वारीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर दिसत आहेत. नगर तालुक्यात ज्वारीच्या उत्पादनात ५० टक्क्याहून अधिक घट होणार आहे.विळद, देहरे, नांदगाव, शिंगवे अशी तालुक्यातील चार-दोन गावे सोडली तर गव्हाची पेरणी कुठेच झाली नाही. तालुक्यात गव्हाच्या पेरणीत १० टक्क्याने घट झाली आहे. बहुतांशी ठिकाणी गव्हाची पेरणीच झाली नाही.कमी पाऊस आणि पाण्याचे उद्भव कोरडे पडत चालल्याने गव्हाच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हरभऱ्याचे पीक मात्र काही भागात चांगल्याप्रकारे दिसत आहे.(वार्ताहर)