राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी व्हावे
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:29:40+5:302014-07-13T00:17:12+5:30
अहमदनगर : राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४-१५ साठी राबविण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले आहे.

राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी व्हावे
अहमदनगर : राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४-१५ साठी राबविण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले आहे. या योजनेत जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनी केले.
या विमा योजनेत बाजरी, सोयाबीन, मूग, कापूस, भात, तूर, उडिद, भुईमूग व कांदा या पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यास त्यांना या विमा योजनेचा फायदा मिळणार आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना योजनेतील सर्व पिकांसाठी दहा टक्के अनुदान देण्यात येणार आहे. योजनेत जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरण्यासाठी बँकेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय पीक विमा
अकोले : बाजरी, भुईमूग आणि भात.
संगमनेर : सोयाबीन, मूग, तूर,भुईमूग, कापूस, कांदा.
कोपरगाव : बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, कांदा.
राहाता : बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा.
राहुरी : बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा.
नेवासा : बाजरी, तूर, भुईमूग, कापूस, कांदा.
श्रीरामपूर : बाजरी, सोयाबीन, तूर, भुईमूग,
कांदा
नगर : बाजरी, तूर, मूग, भुईमूग, कांदा.
शेवगाव : कापूस, भुईमूग, मूग, बाजरी.
पाथर्डी : कापूस, कांदा, भुईमूग, मूग, तूर, बाजरी.
पारनेर : बाजरी, तूर, उडिद, भुईमूग, कांदा.
कर्जत : बाजरी, तूर,मूग.
जामखेड : बाजरी, तूर, मूग, उडिद, भुईमूग, कापूस.
श्रीगोंदा- बाजरी, तूर, मूग, कांदा यांचा समावेश आहे.