संजीवनी पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST2021-06-18T04:15:24+5:302021-06-18T04:15:24+5:30
विद्यार्थ्यांमध्ये अजित संजय नाईकवाडे, मयूर चंद्रशेखर बाविस्कर, साहील दिलीप दुशिंग, मंथन अप्पासाहेब गोसावी, दर्शन श्रीराम सोनवणे, अमर अर्जुन ...

संजीवनी पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नोकरी
विद्यार्थ्यांमध्ये अजित संजय नाईकवाडे, मयूर चंद्रशेखर बाविस्कर, साहील दिलीप दुशिंग, मंथन अप्पासाहेब गोसावी, दर्शन श्रीराम सोनवणे, अमर अर्जुन सैंदोरे व श्रद्धा सूर्यकांत मोटे यांचा समावेश आहे.
शारीरिक व आर्थिक बळ नसताना पाल्यांच्या पंखात बळ भरण्याचे काम पालक अविरत करत असतात. अशा पालकांच्या साथीला संजीवनी नेहमीच एक पाऊल टाकते. पालकांच्या व पाल्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संजीवनीचे व्यवस्थापन अनोखा पॅटर्न राबवीत आहे. त्यामुळे संजीवनीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत, तर काहींना यशस्वी उद्योजक बनविले आहे. संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी शासकीय सेवेतही आहेत. अनेक नामांकित कंपन्यांच्या संपर्कात संस्था असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न चालू आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.
माजी मंत्री व संजीवनीचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही कौतुक केले.
--------