जितेंद्र, एकता कपूर शनी चरणी नतमस्तक
By Admin | Updated: August 17, 2014 00:04 IST2014-08-16T23:55:03+5:302014-08-17T00:04:43+5:30
सोनई : सिने अभिनेते जितेंद्र व चित्रपट निर्माती एकता कपूर यांनी शनिवारी शिंगणापूरला भेट देऊन शनीदर्शन घेतले.

जितेंद्र, एकता कपूर शनी चरणी नतमस्तक
सोनई : सिने अभिनेते जितेंद्र व चित्रपट निर्माती एकता कपूर यांनी शनिवारी शिंगणापूरला भेट देऊन शनीदर्शन घेतले.
उदासी महाराज मठात जितेंद्र व एकता कपूरने शनी अभिषेक केला. त्यानंतर देवस्थानच्यावतीने विश्वस्त नितीन शेटे, सयाराम बानकर यांनी त्यांचा सत्कार केला. आजपर्यंत मला देवाच्या कृपेने यश मिळाले. शनी देवाच्या दारात कुणीही हिरो नसतो. शनी दर्शनाने समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया जितेंद्र याने दिली. एकता कपूर म्हणाली, मी कुठलीही मालिका व चित्रपटाची सुरुवात करताना शनीदर्शनासाठी येते. एकता कपूरनेही नवीन चित्रपटाच्या सीडीची पूजा केली. सलग सुट्ट्या व तिसऱ्या श्रावण शनिवारनिमित्त शिंगणापूर येथे दर्शनासाठी गर्दी झाली आहे. सोनई-शिंगणापूर मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. (वार्ताहर)