झेलम एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू : २६ मेंढ्या चिरडून ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:36 IST2018-09-15T18:36:15+5:302018-09-15T18:36:52+5:30
झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.

झेलम एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू : २६ मेंढ्या चिरडून ठार
श्रीरामपूर : झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.
शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झेलम एक्सप्रेस मनमाडहून अहमदनगरच्या दिशेने चालली होती. एम.आय.डी.सी. परिसरात मेंढ्या व एक व्यक्ती रेल्वेखाली सापडली. यात २६ मेंढ्या व एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्यापपर्यत ओळख पटलेली नसल्याचे शहर व रेल्वे पोलिसांनी सांगितले. झेलम एक्स्प्रेसच्या चालकाने श्रीरामपूर रेल्वे स्थानकाच्या अधिका-यांना अपघात घडल्याचे कळविले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर रेल्वे काही काळ घटनास्थळी थांबली होती. विशेष म्हणजे या गाडीची श्रीरामपूर येथे येण्याची वेळ सकाळी १० वाजून १० मिनिटे आहे. कालच ती उशिराने धावत होती. मयताची ओळख पटविण्याचे काम शहर पोलीस करत आहेत.