घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST2021-02-14T04:20:22+5:302021-02-14T04:20:22+5:30

१ लाख १४ हजारांचे दागिने चोरले अहमदनगर : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे ...

Jewelry, money stolen by burglary | घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

घरफोडी करून दागिने, पैसे चोरले

१ लाख १४ हजारांचे दागिने चोरले

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील नान्नज येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १४ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. १२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात हनुमंत कल्याण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक राजू थोरात हे पुढील तपास करत आहेत.

सोन्याची चेन चोरली

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील मढी येथून चोरट्याने ३५ हजार रुपये सोन्याची चेन चोरून नेली. ११ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शंकर नानासाहेब पवार यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हेड कॉस्टेबल दळवी हे पुढील तपास करत आहेत.

कारमधून दागिने, मोबाइल लांबविले

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील रांधे येथे कारमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात शीतल दादासाहेब पानमंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉस्टेबल कदम हे पुढील तपास करत आहेत.

मोटारसायकल चोरली

अहमदनगर: शहरातील तक्ती दरवाजा येथे घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. ११ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुस्ताक अहमद जहूर अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मुकुंद दुधाळ हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Jewelry, money stolen by burglary