गळ्याला कोयता लावून लुटले दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:16+5:302021-01-08T05:05:16+5:30

गोठ्यातून चोरल्या दोन गायी अहमदनगर : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या दोन ...

Jewelry looted with a scythe around the neck | गळ्याला कोयता लावून लुटले दागिने

गळ्याला कोयता लावून लुटले दागिने

गोठ्यातून चोरल्या दोन गायी

अहमदनगर : नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरून नेल्या. २७ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात राहुल पोपट शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मरकड हे पुढील तपास करत आहेत.

भाजीबाजारातून चोरले पैसे

अहमदनगर : शेवगाव येथे रविवारी भाजीबाजारातून चोरट्याने रोख ५ हजार रुपये, मोबाइल व एक मोबाइल असा एकूण दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात महादेव किसन घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दराडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Jewelry looted with a scythe around the neck