जेसीबी,टेम्पोसह वाळूसाठा जप्त
By Admin | Updated: March 18, 2024 18:03 IST2014-05-17T00:39:49+5:302024-03-18T18:03:33+5:30
पारनेर : तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीविरोधात प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली असून वडगाव गुंड येथे एक जेसीबी तर देसवडे येथे सुुमारे अठरा ब्रास वाळूसाठा व एक टेम्पा पकडला.

जेसीबी,टेम्पोसह वाळूसाठा जप्त
पारनेर : तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीविरोधात प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली असून वडगाव गुंड येथे एक जेसीबी तर देसवडे येथे सुुमारे अठरा ब्रास वाळूसाठा व एक टेम्पा पकडला. तालुक्यात कुरूंद, कोहोकडी, निघोज, शिरसुले, वडगाव गुंड तसेच टाकळीढोकेश्वर पलिकडील मांडवे, देसवडे, पळशी, नागापुरवाडी, गाजदीपूर, पोखरी व काही गावांमधील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांनी कारवाई करुन वाळूसाठा जप्त केला. दोन दिवसापूर्र्वी वडगाव गुंड येथील महेश गुंड याचा जे.सी.बी.पकडल्यानंतर प्रांताधिकार्यांच्या नेतृत्वाखालील पथकाला देसवडेत गट नं ५१० मध्ये दगडू लक्ष्मण भोर व सखाराम लक्ष्मण भोर यांच्या शेतात बारा ब्रास वाळू साठा आढळला. तसेच गट नंबर ५८० मध्ये संतोष कोंडीबा वाडेकर यांच्या शेतात सहा ब्रास वाळू साठा आढळून आला. प्रांताधिकार्यांनी वाळूचा पंचनामा केला. चोरटी वाळू वाहतूक करणारा टेम्पो (एमएच १६-ए.ई.५५०९) पकडण्यात आला. त्यानंतर टेम्पो चालक सचिन सुभाष ढोकले, मालक काशीनाथ रंगनाथ हुलावळे यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांवर दंड, गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जणार असल्याचे भोर यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)