स्वच्छ शहर अभियानात जामखेडकरांचा सहभाग हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST2020-12-27T04:15:34+5:302020-12-27T04:15:34+5:30

जामखेड : माझ शहर स्वच्छ सुंदर असावे ही संवेदना नागरिकात निर्माण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी ...

Jamkhedkar should participate in Swachh Shahar Abhiyan | स्वच्छ शहर अभियानात जामखेडकरांचा सहभाग हवा

स्वच्छ शहर अभियानात जामखेडकरांचा सहभाग हवा

जामखेड : माझ शहर स्वच्छ सुंदर असावे ही संवेदना नागरिकात निर्माण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी नदी खोलीकरणाच्या माध्यमातून शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र शहरातील नागरिकांकडून स्वच्छता मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत सुनंदा पवार यांनी व्यक्त केली. पुढील काळात नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता अभियानासंदर्भात पवार यांनी जामखेड शहरात नागरिक, पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

पवार म्हणाल्या, जामखेडपेक्षा कर्जतकरांचा स्वच्छता सर्वेक्षणातील सहभाग उल्लेखनीय आहे. तेथे नागरिक श्रमदान करतात. पवार कुटुंबानेही यामध्ये झोकून दिले आहे. जामखेडमध्ये तसा प्रयत्न केला. परंतु, येथील नागरिक स्वेच्छेने बाहेर पडत नाहीत. माझ शहर स्वच्छ, सुंदर असाव, अशी जाणीव नागरिकांमध्ये निर्माण व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील भिंती ‘बोलक्‍या’ करण्यासाठी पवार यांच्या माध्यमातून तीस लाखांचा रंग नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, महावितरण अभियंता विलास कासलीवाल, नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ ढवळे, मयूर भोसले आदी उपस्थित होते.

फोटो : २६ जामखेड पवार

स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी जामखेड शहरातील भिंती ‘बोलक्या’ करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून नगरपरिषदेला रंग देण्यात आला.

Web Title: Jamkhedkar should participate in Swachh Shahar Abhiyan