दर्शन लोढा घेणार जैन दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:55+5:302021-02-17T04:25:55+5:30

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे जैन समाजाचे लोढा कुटुंबीय राहतात. कांतीलाल मिश्रीलाल लोढा उर्फ गादीवाले काका या नावाने सुप्रसिद्ध ...

Jain initiation to take Darshan Lodha | दर्शन लोढा घेणार जैन दीक्षा

दर्शन लोढा घेणार जैन दीक्षा

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे जैन समाजाचे लोढा कुटुंबीय राहतात. कांतीलाल मिश्रीलाल लोढा उर्फ गादीवाले काका या नावाने सुप्रसिद्ध आहेत. या लोढा कुटुंबयात नंदकुमार व वर्धमान ही काकांची दोन मुले. त्यातील नंदकुमार लोढा यांचा अठरा वर्षांचा मुलगा दर्शनकुमार लोढा याने जैन धर्माची दीक्षा घेण्याचे ठरवले आहे. दर्शन याचे माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल राहुरी फॅक्टरी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण राहुरी येथे झालेले आहे. दर्शन याचा दीक्षा समारंभ मालेगाव येथे येत्या २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभामध्ये दर्शनच्या समवयस्क देशातील ५ बाल ब्रह्मचारी दीक्षा घेणार आहेत. या समारंभास देशभरातून संत मंडळी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Jain initiation to take Darshan Lodha