भाविकांना जेल, गुन्हेगारांना बेल..राज्य सरकारच्या कारभारावर माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:15 IST2020-08-29T14:14:39+5:302020-08-29T14:15:33+5:30
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक, भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे, अशी टीका राज्य सरकारवर आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.

भाविकांना जेल, गुन्हेगारांना बेल..राज्य सरकारच्या कारभारावर माजीमंत्री बबनराव पाचपुते यांची टीका
श्रीगोंदा : कोरोनात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक, भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल, असा सरकारचा कारभार सुरु आहे, अशी टीका राज्य सरकारवर आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.
राज्य सरकारला दारूची दुकाने सुरु करण्याची घाई झाली होती. पण धार्मिकस्थळे उघडण्यास परवानगी का दिली जात नाही? असा सवालही त्यांनी केला. श्रीगोंदा येथे शनिवारी आयोजित घंटानाद आंदोलनात पाचपुते बोलत होते.
यावेळी सुनीलराव थोरात , संदीप नागवडे, अशोक खेंडके, सुहासिनी गांधी, दादाराम ढवाण, राजेंद्र उकांडे, संतोष रायकर, संतोष खेतमाळीस, शहाजी हिरवे, शहाजी खेतमाळीस, संग्राम घोडके, सुनील वाळके, अंबादास औटी, महावीर पटवा, दीपक हिरनावळे, मंदाकिनी शेलार, नितीन नलगे, दत्तात्रय जगताप उपस्थित होते.