संचमान्यता, अनुदान वितरणासह प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:28+5:302021-01-03T04:21:28+5:30

राज्यमंत्री कडू यांनी विविध शिक्षक संघटनांसमवेत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच मुंबई येथे केले होते. या बैठकीत शिक्षण ...

The issue will be sorted out with aggregation, grant distribution | संचमान्यता, अनुदान वितरणासह प्रश्न मार्गी लावणार

संचमान्यता, अनुदान वितरणासह प्रश्न मार्गी लावणार

राज्यमंत्री कडू यांनी विविध शिक्षक संघटनांसमवेत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच मुंबई येथे केले होते. या बैठकीत शिक्षण विभागाच्या संबंधी प्रलंबित प्रश्न तथा विविध संघटनांकडून प्राप्त निवेदनासंदर्भात विचारविमर्श व कार्यवाहीसंबंधी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिक्षक संघटनेचे निमंत्रित सदस्य शारीरिक शिक्षण महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे व मुंबई महानगरपालिका युनिटचे डाॅ. जितेंद्र लिंबकर यांनी विविध अडचणींबाबत संघटनेच्या वतीने बाजू मांडली. संचमान्यतेतील त्रुटी दूर करून संचमान्यता निकष लागू करावेत, संचमान्यतेत शारीरिक शिक्षकाचे पहिले पद हे सहावे व दुसरे पद बारावे असावे, वेळापत्रकात शिक्षकाचा कार्यभार हा सहावी ते दहावी/बारावी या वर्गांचा असावा, निवडश्रेणीसाठी एम.पी.एड.ची अट रद्द करावी, राजीव गांधी अपघात विम्यात खेळाडू अपघात विम्याचा समावेश करावा, वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी क्रीडा प्रशिक्षण धरण्यात यावीत, आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, नोकरभरतीत पवित्र पोर्टलमधील सर्व त्रुटी दूर करून वंचित बीपीएड-एमपीएडधारकांना न्याय देऊन भरती करण्यात यावी, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे अंशकालीन शिक्षकांना कायम शिक्षक म्हणून घ्यावे या व इतर विषयपत्रिकेतील मागण्यांसदर्भात बैठकीत बाजू मांडली असता राज्यमंत्र्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले.

अर्थ विभागाशी निगडित तसेच धोरणात्मक निर्णय उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी बैठक घेऊन सोडवले जाईल. तसेच शालार्थ आय-डी व संचमान्यता दुरुस्तीसंबंधी तात्काळ संबंधित अधिकार क्षेत्रात बदल करून शाळांची ससेहोलपट थांबविण्यात येईल. तसेच १५ जानेवारीनंतर प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयात संघटना प्रतिनिधीसोबत बैठका घेऊन तात्काळ प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे कडू यांनी संघटनेच्या पदाधिऱ्यांना आश्वासित केले.

या बैठकीस आ. कपिल पाटील, डाॅ. नितीन चवाळे, धन्यकुमार हराळ, दिनेश भालेराव, घनश्याम सानप, संगीता शिंदे, सुभाष मोरे, डाॅ. संजय शिंदे, शेखर भोयर, आनंद पवार, राजेश जाधव, राजेंद्र पवार, विलास घोगरे, रणजीत देशमुख, महेश ठाकरे, सचिन ढवळे, दत्ता काळे यांच्यासह विविध राज्य संघटनांचे प्रतिनिधी तसेच शिक्षण विभाग, बालभारती, समग्र शिक्षा अभियान, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

-------------

फोटो - ०२क्रीडा निवेदन

संचमान्यतेतील त्रुटी व निवड श्रेणीच्या जाचक अटी रद्द करण्याबरोबरच अनुदान वितरणासह इतर प्रश्न मार्गी लावण्याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: The issue will be sorted out with aggregation, grant distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.