शिक्षक बँकेच्या व्याजदराचा मुद्दा पेटला
By Admin | Updated: May 26, 2014 00:24 IST2014-05-26T00:00:23+5:302014-05-26T00:24:13+5:30
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जावरील व्याजदर कमी न केल्यास बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या घरापुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी दिला आहे.

शिक्षक बँकेच्या व्याजदराचा मुद्दा पेटला
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जावरील व्याजदर कमी न केल्यास बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या घरापुढे धरणे आंदोलन करण्याचा इशारा सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांनी दिला आहे. सभासदांच्या न्याय मागण्याकडे दुर्लक्ष करून सभासद व संस्थेच्या अहितकारी निर्णयामुळे सभासदांचे नुकसान झाले आहे. सभासदांच्या कर्जावरील व्याज दर, कर्ज मर्यादेत वाढ, ठेवीवरील व्याज, लाभांश वाटप व अनावश्यक खरेदी, तसेच गरज नसतांना केलेल्या खर्चाबाबत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना अनेक वेळा विनंती, आंदोलने, धरणे माध्यमातून त्यांची कार्यशैली बदलण्याची मागणी केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत असून सभासद हित विरोधी निर्णय घेतांना दिसत आहेत. यामुळे सभासदांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सदिच्छा मंडळाच्या माध्यमातून पुढील बाबींवर १ जून पर्यंत निर्णय न झाल्यास सदिच्छा मंडळ व शिक्षक संघाचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत. कर्जावरील व्याजदर दहा टक्के करावा, कर्ज मर्यादा १० लाख करावी, कायम ठेवीवर व कर्जावरील व्याजदारात ३ टक्के तफावत ठेवावी, लाभांश वाटप करावा, कोअर बँकिंग प्रणालीमध्ये झालेल्या खर्चाची संबंधितावर जबाबदारी निश्चित करून नव्याने निविदा काढण्यात यावी, सभासदांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यासाठी दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात. आदी मागण्या केया आहे. (प्रतिनिधी)