वारीतील प्रलंबित घरकुलांचा प्रश्न लवकरच सुटेल
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:12+5:302020-12-06T04:21:12+5:30
सूर्यवंशी म्हणाले, वारी येथे शेती महामंडळ व सोमैया कारखाना यांच्या शेकडो कामगारांचे घरकुल मंजूर आहे; परंतु या लाभार्थींच्या नावावर ...

वारीतील प्रलंबित घरकुलांचा प्रश्न लवकरच सुटेल
सूर्यवंशी म्हणाले, वारी येथे शेती महामंडळ व सोमैया कारखाना यांच्या शेकडो कामगारांचे घरकुल मंजूर आहे; परंतु या लाभार्थींच्या नावावर स्वतःच्या मालकीची जागाच नसल्याने त्यांना घरकुलाचा प्रत्यक्षात लाभ घेता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाने अशांना जागा उपलब्ध करून घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांत जागा नसलेल्या लाभार्थींसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. त्यामुळे वारीतील ही समस्या लवकरच सुटेल. यावेळी विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमळ, शाखा अभियंता प्रकाश शिंदे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, सरपंच सतीश कानडे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके, विजय गायकवाड, संजय जाधव, प्रकाश गोर्डे, सुवर्णा गजभिव उपस्थित होते.