शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:04 IST

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.

प्रमोद आहेर ।  शिर्डी : ‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.‘ऋषींचे कुळ आणि नदीचं मूळ’ शोधू नये म्हणतात़ साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांनी अनेकदा विचारूनही आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केला नाही़. भविष्यात जात, धर्मच माणुसकीचे मोठे अडसर ठरतील हे त्यांना माहीत असेल. हिंदू त्यांना ‘संत ’तर मुस्लिम त्यांना ‘पीर’ समजत़ म्हाळसापतींनी आगमन प्रसंगी दिलेले नावच त्यांनी अंगीकारले. धुळे कोर्टातील एका खटल्यात कमिशनवर साक्ष देतांना साईबाबांनी आपला पंथ किंवा धर्म ‘कबीर’ (हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत) आणि जात ‘परवरदिगार’ ( अल्ला किंवा ईश्वर) असल्याचे सांगितले होते. जात, धर्म माहीत नसल्याने साईबाबा जगभरातील भाविकांसाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहेत. दाभोळकर लिखित मूळ चरित्रही हेच सांगते.  जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरणसंत दासगणू लिखित सेलुच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरित्रात साईबाबा पाथरीला जन्मल्याचा व बाबासाहेब उर्फ गोपाळराव साईबाबांचे गुरू असल्याचा उल्लेख आहे. हाच धागा पकडून १९७५ च्या सुमारास विश्वास खेरांनी साईबाबांचे नाव हरिभाऊ भुसारी असून ब्राम्हण कुटुंबात जन्मल्याचा तर्क लावला. मात्र मधील दोन पिढ्यांची माहिती मिळाली नसल्याने तेही साशंक होते. वास्तविक गोपाळराव महाराजांचे निर्वाण मंगळवार, १५ डिसेंबर १८०१ रोजी साईबाबांच्या जन्माच्या आधीच झाले.बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम येथे झाल्याचे सांगतात. एका तमिळ चरित्रात साठेशास्त्री व लक्ष्मीबाईच्या पोटी साईबाबा जन्मल्याचा उल्लेख आहे. गुजराती साईसुधा बाबांचा जन्म ११ आॅगस्ट १८५८ रोजी गुजराती ब्राम्हण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जेरुसलेमच्या जाफा दरवाजात झाल्याचा व तेथून ते पाथरीला गेल्याचे सांगते. मंगळवेढ्यात एक दिंगबर नावाचे बुवा होते. तेच साईबाबा असल्याचीही चर्चा त्यावेळी होती़.साई शरणानंद लिखित चरित्रात बाबांचा जन्म पाथरीला गंगाभव व देवगिरी अम्मा यांच्या पोटी झाला आहे. साईबाबा १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे असावेत, असाही संशय व्यक्त झाला. शिर्डीत आलेल्या पाथरीच्या माणसाकडे बाबांनी तिकडची माहिती विचारली याचा अर्थ त्यांना पाथरीची माहिती होती. मात्र ते पाथरीचेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ब्रिटिशांनाही याबाबत शोध घेता आला नाही. त्यांचे कुणी नातेवाईकही फिरकले नाहीत. एकूणच जन्मस्थानाचे व आई-वडिलांबाबतचे दावे तर्कावर आधारित आहेत. अनेक महात्म्ये, संत जातीचे लेबल लावल्याने मर्यादित झाले. साईबाबांनाही तथाकथित जन्मस्थानाच्या माध्यमातून जाती, धर्माचे लेबल लागणे मानवतेच्या हिताचे नाही.साईबाबांनी गोपनीय ठेवलेल्या बाबींवर भाष्य करणे साईबाबांवर अन्याय करणारे व करोडो भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे ठरेल. पाथरीच्या साईमंदिराचा विकास झाला तर आनंदच आहे. मात्र तथाकथित जन्मस्थानाच्या ओळखीतून साईबाबांची सर्वधर्म समभावाची ओळख पुसायला नको, असे साईभक्तांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबाshirdiशिर्डीUddhav Thackerayउद्धव ठाकरे