शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी झोडपले;  आठ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:55 IST

केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैध पाणी उपसा करीत होते. हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील केळेवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठ्याचा शेतकरी अवैध पाणी उपसा करीत होते. हे पाणी बंद करण्यासाठी गेलेल्या पाटबंधारेच्या अभियंत्याला शेतक-यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ शेतकºयांविरुध्द घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (४ मे) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांच्यासह चौकीदार के.एम.ढोमसे, डी.एम.आरोटे, महावितरणचे वायरमन मिसाळ, नितीन लामखडे हे केळेवाडी येथील धरणातील होणारा अवैध पाण्याचा उपसा बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील विद्युत पुरवठा बंद करीत असताना येथील लाभधारक शेतकरी राजू किसन लामखडे, एकनाथ दामू लामखडे, अनिल वसंत लामखडे, अतुल कोंडीभाऊ लामखडे, संतोष यमनाजी लामखडे, गणेश म्हतू लामखडे, उत्तम सोपान लामखडे, सुभाष धोंडिबा लामखडे (रा.सर्व केळेवाडी बोटा, ता.संगमनेर) हे सर्व कोरोनाची संचारबंदी लागू असताना विनापरवाना जमा झाले. त्यापैकी राजू किसन लामखडे, एकनाथ दामू लामखडे, संतोष यमनाजी लामखडे यांनी अभियंता रजनीकांत कवडे व सोबतचे कर्मचारी यांना मोटारींचे विद्युत कनेक्शन का तोडता? असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून कवडे यांना मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात संगमनेर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली आहे. घारगाव पोलिसांनी या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.नोटिसा देऊनही पाणी उपसा सुरूच संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा परिसरातील केळेवाडी येथील लघु प्रकल्पातील १.१९ दशलक्ष घनफूट इतके पाणी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार आरक्षित करण्यात आले होते. याबाबत येथील लाभधारक शेतकºयांना या धरणातील पाणी उपसा बंद करण्याबाबत संगमनेरच्या पाटबंधारे विभागाने २७ एप्रिल रोजी नोटीस दिली होती. पाटबंधारे संगमनेर विभागाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी ३० एप्रिल रोजी पुन्हा विद्युत मोटारी काढण्याबाबत तोंडी कळविले होते. त्यानंतर २ मे रोजी पुन्हा संबधित शेतकºयांना अंतरीम नोटीस देण्यात आली होती. असे असतानाही अवैध पाण्याचा उपसा सुरूच होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरDamधरणWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी