नेवाशातील टँकर घोटाळ्याची चौकशी करा

By | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:07+5:302020-12-09T04:17:07+5:30

गरड यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील टँकर घोटाळा चव्हाट्यावर आणला. यात टँकर खेपांसाठी बनावट ...

Investigate the tanker scam in Nevasa | नेवाशातील टँकर घोटाळ्याची चौकशी करा

नेवाशातील टँकर घोटाळ्याची चौकशी करा

गरड यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील टँकर घोटाळा चव्हाट्यावर आणला. यात टँकर खेपांसाठी बनावट जीपीएस अहवाल वापरले गेले. त्याच धर्तीवर नेवासा येथे २०११ ते २०१७ या काळात खासगी टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्यात गैरव्यवहार झाला आहे. पाणीपुरवठ्याचे बिल प्राप्त करण्यासाठी ठेकेदाराने येथील कर्मचाऱ्यांना हातशी धरून एकही जीपीएस लोकेशन रिपोर्ट सादर केलेला नाही. मूळ जीपीएस लोकेशन अहवालाऐवजी मायक्रोसाॅफ्ट एक्सेल, वर्ल्ड फाईलमध्ये माहिती तयार करून त्याच्याच प्रति बिलासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे नेवासा पंचायत समितीतील पाणीपुरठ्याचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित टँकरने पाणीपुरवठा करणारी ठेकेदार कंपनी, लेखा परीक्षक यांच्यावर जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गरड यांनी केली आहे.

-----------

तक्रारीला केराची टोपली

याबाबत गरड यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने त्यांचा अर्ज निकाली काढला; परंतु त्यात कोणतीही भरीव कारवाई न करता तक्रारीला केराची टोपली दाखविली, असेही गरड यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Investigate the tanker scam in Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.