बाळ बोठे याला आर्थिक सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:15+5:302021-07-14T04:24:15+5:30
या निवेदनात जरे यांनी म्हटले आहे की, रेखा जरे या सामाजिक काम करत असताना त्यांनी अनेक शासकीय कार्यालयातील गैरकारभाराविरोधात ...

बाळ बोठे याला आर्थिक सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा
या निवेदनात जरे यांनी म्हटले आहे की, रेखा जरे या सामाजिक काम करत असताना त्यांनी अनेक शासकीय कार्यालयातील गैरकारभाराविरोधात आवाज उठविला होता. याच दरम्यान बोठे याने जरे यांचे लेटरपॅड वापरून काही शासकीय अधिकाऱ्यांविरोधात निवेदन दिले होते. या माध्यमातून बोठे हा जरे यांची भीती दाखवून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळत होता. तपासादरम्यान बोठे याच्या घरात व कार्यालयात जरे यांचे लेटरपॅड व काही कागदपत्रे मिळाली आहेत. बोठे याने रेखा जरे यांना मारण्यासाठी बारा लाख रुपयांची सुपारी दिली होती. मात्र बोठे याला हे पैसे कुणी आणि का दिले? हे अद्यापपर्यंत समोर आलेेले नाही. या प्रकरणाची चौकशी करत असताना काही कागदपत्रे मला मिळाली आहेत. त्यानुसार माझे असे मत आहे की, बोठे याने जरे यांच्या लेटरपॅडवर ज्या अधिकाऱ्यांविरोधात निवेदने दिली होती त्या अधिकाऱ्यांनी जरे यांना गप्प बसविण्यासाठी बोठे याला पैसे दिले होते. भ्रष्टाचारी प्रकरणांचा मात्र जरे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यामुळे याच अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन बोठे याने हत्येची सुपारी दिली असावी. असे मला वाटते. त्या अनुषंगाने तपास करून दोषींवर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच बोठे याचे मागील पाच वर्षांतील कॉल डिटेल्स, मोबाइल लाेकेशन, सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले चॅटिंग आदींबाबत चाैकशी करावी, बोठे याचे जवळचे नातलग व मित्रांचीही चौकशी करावी. पंधरा दिवसांत या प्रकरणाची चौकशी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करणाऱ्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.