अवैध वाळूउपसा : संगमनेरमध्ये वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:41 IST2019-06-20T19:41:28+5:302019-06-20T19:41:35+5:30
संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा होत असलेल्या येठेवाडी परिसरातील खडी क्रेशरजवळ घारगाव पोलिसांच्या पथकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू

अवैध वाळूउपसा : संगमनेरमध्ये वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा होत असलेल्या येठेवाडी परिसरातील खडी क्रेशरजवळ घारगाव पोलिसांच्या पथकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनासह एकूण चार लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यातील येठेवाडी शिवारातील मुळा नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा करून एक वाहन येथील खडीक्रेशर जवळ आल्याची माहिती पोलीस नाईक संतोष खैरे यांना खब-यामार्फत मिळाली होती. पोलीस पथकाने गुरुवारी (दि.20) दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी अवैध वाळू उपसा करणारे वाहन (एम.एच.०३ ए. एच.१७३२)पकडले.यात चार लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी दिलेल्या फियार्दीवरून राहुल शांताराम वाडगे (वय २६), दादाभाऊ विठ्ठल वाडगे, संजय/रेज्या शिवाजी वाडगे तिघेही (रा.येठेवाडी ता.संगमनेर)यांच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय विखे करत आहेत.