२५ इच्छुकांच्या काँग्रेसकडे मुलाखती

By Admin | Updated: August 20, 2014 23:31 IST2014-08-20T23:26:05+5:302014-08-20T23:31:15+5:30

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार बुधवारी प्रदेश समितीने मुलाखती घेतल्या.

Interviews with 25 interested Congress | २५ इच्छुकांच्या काँग्रेसकडे मुलाखती

२५ इच्छुकांच्या काँग्रेसकडे मुलाखती

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार बुधवारी प्रदेश समितीने मुलाखती घेतल्या. स्श्रीरामपूर, कर्जत आणि नगर विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांनी बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या, अशी माहिती जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित होते. मुलाखती दरम्यान मतदारसंघानिहाय इच्छुकांनी श्रेष्ठींना विजयाची गणिते समजावून सांगितली. श्रीरामपूर मतदारसंघातून सर्वाधिक १२ उमेदवार, नगर शहरातून ७ तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून ६ जणांचा समावेश असल्याचे ससाणे यांनी सांगितले. शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघातून मंत्री विखे, थोरात वगळता अन्य कोणीच अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे या ठिकाणच्या मुलाखती झाल्या नाहीत. जिल्ह्यात जे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहेत. त्यासाठीच मुलाखती झाल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Interviews with 25 interested Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.