एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:25+5:302021-09-19T04:22:25+5:30
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या खरीप पीक प्रात्यक्षिक भेट व ...

एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्यांना वरदान
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या खरीप पीक प्रात्यक्षिक भेट व शेतकऱ्यांबरोबर सुसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लाखन सिंग उपस्थित होते. यावेळी पंडित खर्डे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, तांभेरेचे सरपंच नितीन गागरे, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.
कुलगुरू पाटील म्हणाले, पारंपरिक शेतीला दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन या व्यवसायांची जोड देऊन शेतकरी एकात्मिक शेती पद्धतीद्वारे शाश्वत उत्पन्न मिळवू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण युवकांनी रोपवाटिका, आधुनिक सिंचन पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण, प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात उतरणे क्रमप्राप्त आहे.
डॉ. लाखन सिंग म्हणाले, शेतकऱ्यांनी शेती करताना तंत्रज्ञानाची साथ घ्यावी व शास्त्रीयदृष्ट्या शेती करावी. शेतकऱ्यांनी विस्तार अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांशी संपर्क ठेवावा. शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर राबवावे. नवनवीन शेतीविषयक प्रयोग करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले.
180921\1747-img-20210916-wa0035.jpg
तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकर्यांमध्ये आत्मविश्वास वाढला,एकात्मिक शेती पध्दतीमुळे पोषणमुल्यांची सुरक्षितता वाढली-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील