‘ती’च्या गणपतीची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:48 IST2017-08-25T13:41:17+5:302017-08-25T13:48:31+5:30
शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय दरम्यान भव्य मिरवणूक काढून श्रींची महिलांच्या हस्ते विधीवत स्थापना करण्यात आली.

‘ती’च्या गणपतीची प्रतिष्ठापना
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय दरम्यान भव्य मिरवणूक काढून श्रींची महिलांच्या हस्ते विधीवत स्थापना करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात ‘श्रीं’चा जयघोष करीत सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालय सकाळी ११ वाजता गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.
‘लोकमत’ने गेल्या वर्षीपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. टाटा टी गोल्ड मिक्श्चर व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ती’चा गणपती हा उपक्रम साजरा करण्यात येतो. या अंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, ५ दिवस आरती, पूजा, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
दररोज शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात येणार आहे. शिवाय दररोज लकी ड्रॉ द्वारे महिलांना आकर्षक पैठण्या जिंकता येणार आहे. तसेच वन मिनीट गेम शो, मराठी-हिंदी गीतांचा सुरेल नजराणा, अथर्वशीर्ष पठण, मोदक बनवा, फुलांचे हार बनवा, रांगोळी आदी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत़
- फोटो पाठवा...
- घरी, कॉलनींमध्ये मंडळांकडून आयोजित गणेशोत्सवामध्ये महिलांना अग्रपूजेचा, आरतीचा सन्मान द्यावा. तसेच महिला गणेशाची प्रतिष्ठापना करताना, पूजा करताना किंवा आरती करतानाचे फोटो ‘लोकमत’कडे पाठवा. निवडक फोटो लोकमतमध्ये प्रसिद्ध करू आणि बक्षिसेही देऊ. आपले फोटो ९७६७१२८००६ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठवा किंवा facebook/teecha ganpati या पेजवर अपलोड करा.