शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक-शैक्षणिक चळवळीतील प्रेरणा : रामनाथ वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST

--------------- रामनाथ वाघ यांचा आणि आमच्या गेल्या तीन पिढ्यांचा काैटुंबिक संबंध आहे. वडील भाऊसाहेब झावरे प्राथमिक शिक्षकांचे पुढारी होते. ...

---------------

रामनाथ वाघ यांचा आणि आमच्या गेल्या तीन पिढ्यांचा काैटुंबिक संबंध आहे. वडील भाऊसाहेब झावरे प्राथमिक शिक्षकांचे पुढारी होते. त्यावेळी पांडुरंग फलके गुरुजी, काकासाहेब म्हस्के यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध. पुढे १९७२ मध्ये अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी मी नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पुढे लाॅ काॅलेजला प्रवेश घेतला. अण्णांची व माझी ओळख खासदार चंद्रभान आठरे यांच्या घरी झाली. अण्णांमधला प्रयत्नवादी गुण आम्हाला भावला. त्यांची चाणाक्ष, व्यापक व ज्ञानपूर्ण दृष्टी यामुळे जिल्हा मराठा संस्था उभारणीला गती आली. संस्थेतील शिक्षणाबरोबर त्यांनी राजकीय, कृषी क्षेत्रात भरीव काम केले. त्यांनी जिल्हा मराठा संस्थेला प्रथमच मराठा बोर्डिंगच्या रूपातून बाहेर काढले. केवळ जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून त्यांनी लौकिक मिळवून दिला. त्यांचा पिंड तसा राजकीय. १९६४ मध्ये शरद पवार यांनी त्यांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड केली. पुढे १९७२ नंतर राहुरीतील वांबोरी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे, पाझर तलाव, नाला बंडिंगची कामे केली. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला.

अण्णांनी ६० वर्षांहून अधिक काळ संस्थेसाठी योगदान दिले. संस्थेच्या शाखा वाढविताना शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी काम केले. अण्णा म्हणजे जिल्हा मराठा संस्थेचा सामाजिक चेहरा होते. जीवनाला सतत प्रवाही ठेवल्यामुळे त्यांच्या जगण्याचा परीस सतत परिवर्तनीय ठरत गेला. अध्यक्ष या नात्याने त्यांच्याच प्रेरणेने संस्था पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अण्णांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

- नंदकुमार झावरे, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज