इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधान प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:04 IST2020-10-28T15:03:12+5:302020-10-28T15:04:23+5:30

समाजप्रबोधनकार निवृत्तीनाथ काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल आहे. याबाबत संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू  आहे. या सुनावणीची पुढील तारीख २५ नोव्हेंबर देण्यात आली आहे.

Indorikar Maharaj's controversial statement will be heard on November 25 | इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधान प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधान प्रकरणाची सुनावणी २५ नोव्हेंबरला

 

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्तीनाथ काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल आहे. याबाबत संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू  आहे. या सुनावणीची पुढील तारीख २५ नोव्हेंबर देण्यात आली आहे.

 इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती.

   या प्रकरणात अंनिसच्यावतीने अ‍ॅड. रंजना पगार गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर इंदोरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर
शुक्रवारी सुनावणीवेळी वकिलांमध्ये युक्तीवाद होवून न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी अंनिसच्यावतीने दाखल केलेला अर्ज मान्य केला होता. त्यावेळी पुढील तारीख बुधवारी (२८ ऑक्टोबर) देण्यात आली होती. यावर आता पुढील तारीख  बुधवारी (२५ नोव्हेंबर) देण्यात आली आहे. इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. बी. जी. कोल्हे हे काम पहात आहेत. 

Web Title: Indorikar Maharaj's controversial statement will be heard on November 25