भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर सट्टा, नगरमध्ये एकाला अटक
By अण्णा नवथर | Updated: October 9, 2023 14:46 IST2023-10-09T14:46:00+5:302023-10-09T14:46:08+5:30
गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.

भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर सट्टा, नगरमध्ये एकाला अटक
अहमदनगर:भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विशाल अश्विन आनंद ( वय २७, रा. पटवर्धन चौक, नगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २२ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरातील पटवर्धन चौकात काही तरुण क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत आहेत, अशी गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी अचानक छापा टाकला. तेंव्हा तीन ते चार जण गोलाकार उभे असल्याचे दिसले. अचानक छापा टाकला असता दोघेजण पळून गेले. यातील एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम २२ हजार रुपये एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.