राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:26+5:302021-01-17T04:18:26+5:30

राहाता नगरपालिकेत स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ममता पिपाडा यांच्या हस्ते प्रतिमेचे ...

Incredible contribution of Rajmata Jijau | राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान

राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान

राहाता नगरपालिकेत स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ममता पिपाडा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, भीमराज निकाळे, भाऊसाहेब आरणे, दशरथ तुपे, राहुल सदाफळ, गणेश सदाफळ आदी उपस्थित होते.

पिपाडा म्हणाल्या, ‘आजच्या तरुण पिढीसमोर एक वेगळा आदर्श स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कार्यातून उभा केला. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवली, ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते, जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते. एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारांनीसुद्धा प्रेरित केले.’

यावेळी उपस्थित सर्वांनी स्वामी विवेकानंद, तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.

( १६ पिपाडा)

Web Title: Incredible contribution of Rajmata Jijau