वाढता वाढता वाढे....कोरोनाचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:46+5:302021-03-24T04:19:46+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दिवसाला सरासरी सहाशे जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. ...

Increasingly increasing .... corona patients | वाढता वाढता वाढे....कोरोनाचे रुग्ण

वाढता वाढता वाढे....कोरोनाचे रुग्ण

अहमदनगर : जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दिवसाला सरासरी सहाशे जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. मंगळवारीही तब्बल ६९२ जणांची कोरोना चाचणी प़ॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार ९७८ इतकी झाली आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत एकाच कुटुंबातील अनेक जण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आगामी १५ दिवसांचा काळ धोक्याचा असल्याचा इशाराही सूत्रांनी दिला आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या महिन्यांमध्ये ५० ते ८० च्या दरम्यान असणारी दरदिवसाला येणारी रुग्णसंख्या अचानक वाढली. ही संख्या जवळपास चौपट वाढली. सध्या सरासरी पाचशे ते सहाशे जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. एकाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरातही सरासरी दोनशे जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल, सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे दिसते आहे. तरीही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा दौरे सुरू केले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन करण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनपेक्षा मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्यावर प्रशासन भर देत आहे.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दोन महिन्यांपूर्वी ९७ टक्क्यांच्या पुढे होते. ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९४ टक्के असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. दरदिवशी सरासरी दोन जणांचा मृत्यू होत आहे.

-----------------

कोरोनाची स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ८०९८०

उपचार सुरू असलेले रुग्ण : ३९७८

मृत्यू : ११८९

एकूण रुग्णसंख्या : ८६१४७

--------------

नगर शहरातील स्थिती दरदिवशी सरासरी बाधित- २००

चाचण्यांची केंद्रे-७

कन्टोन्मेंट झोन-१९

कोविड केअर सेंटर-२

----------------

असे वाढले पॉझिटिव्ह

दिनांक पॉझिटिव्ह रुग्ण

१० मार्च ३३७

११ मार्च ३२३

१२ मार्च ५०९

१३ मार्च ४५२

१४ मार्च ४४९

१५ मार्च ५५९

१६ मार्च ४७५

१७ मार्च ६११

१८ मार्च ४५६

१९ मार्च ६६०

२० मार्च ६४३

२१ मार्च ७६५

२२ मार्च ८५७

२३ मार्च ६९२

-------------------

Web Title: Increasingly increasing .... corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.