मुळा नदीपात्रातील आवर्तन वाढविले; मुळा उजवा कालवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:46 IST2019-11-02T18:43:28+5:302019-11-02T18:46:02+5:30
शनिवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरण उजवा कालवा बंद करण्यात आला़. त्यानंतर मुळा नदीपात्रात सायंकाळी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकवरून १ हजार ७०० क्युसेक करण्यात आला आहे़.

मुळा नदीपात्रातील आवर्तन वाढविले; मुळा उजवा कालवा बंद
राहुरी : शनिवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरण उजवा कालवा बंद करण्यात आला़. त्यानंतर मुळा नदीपात्रात सायंकाळी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकवरून १ हजार ७०० क्युसेक करण्यात आला आहे़. मुळा उजव्या कालव्याचा शनिवारी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमूख यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांच्या पथकाने पाहणी केली़.
आमदार झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी मुळा धरणावर धाव घेऊन नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग कमी केला होता़. नदीपात्राऐवजी पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून करण्यात आला होता़. उजव्या कालव्याखालील शेतक-यांनी पाऊस पडला असून पाणी भरपूर झाल्याने पाणी बंद करण्याची मागणी केली होती़. यासंदर्भात मुळा पाटबंधारे खात्याचे अभियंता किरण देशमुख, सहअभियंता सर्वस्वी बाळासाहेब भापकर, प्रवीण दहातोंडे यांनी उजव्या कालव्याची पाहणी केली़.
उजव्या कालव्याखालील शेतक-यांशी पथकाने चर्चा केली़. यापूर्वी आम्ही पाणी सोडा, अशी मागणी करीत होता़. आता पाणी सोडू नका अशी मागणी शेतक-यांनी केली. कालवा बंद करण्याची सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाटबंधारे खात्याला दिली़. कार्यकारी अभियंत्यांनी राहुरी, नेवासा, कुकाणा, पाथर्डी या भागात भेटी देऊन शेतक-यांशी चर्चा केली़. त्यानुसार पाटबंधारे खात्याने उजवा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़.