अर्धवेळ परिचारिकांचे मानधन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:12+5:302021-07-02T04:15:12+5:30
अहमदनगर : अर्धवेळ स्त्री परिचारिकांनी कोरोना काळात सरकारी आरोग्य यंत्रणेने दिलेले काम जबाबदारीने पूर्ण केले. त्यांना रोज ७ ते ...

अर्धवेळ परिचारिकांचे मानधन वाढवा
अहमदनगर : अर्धवेळ स्त्री परिचारिकांनी कोरोना काळात सरकारी आरोग्य यंत्रणेने दिलेले काम जबाबदारीने पूर्ण केले. त्यांना रोज ७ ते ८ तास काम करावे लागते. मात्र पदनामातच अर्धवेळ असल्याने मानधनही तुटपुंजे मिळत आहे. शिवाय कोरोना काळातील भत्ताही अतिशय कमी दिला आहे. त्यामुळे मानधन व कोरोना काळातील भत्ता वाढून मिळावा, निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या परिचारिकांनी केल्या आहेत. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जनआधार सामाजिक संघटनेने दिला आहे.
अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत. कोरोना काळात अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. आजही त्या कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या परिचारिका महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचा ही प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्याची उपाययोजना करावी तसेच, किमान वेतनानुसार त्यांना पगारवाढ करावी व यापुढील सर्व मानधन हे त्यांना ऑनलाईन पद्धतीने देण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्यांचे निवेदन जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पना महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शहेजान शेख, लता कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, किरण जावळे, उमेश करपे आदीसह परिचारिका महिला उपस्थित होत्या. मागणी मान्य न झाल्यास ५ जुलैला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
..............
०१ झेडपी निवेदन