बुरुडगाव पाणी योजनेचा कृती आराखड्यात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:41+5:302021-07-22T04:14:41+5:30
अहमदनगर : येथील बुरुडगाव पाणी योजनेचा जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आला असून, प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात ...

बुरुडगाव पाणी योजनेचा कृती आराखड्यात समावेश
अहमदनगर : येथील बुरुडगाव पाणी योजनेचा जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आला असून, प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात बुरुडगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरवठा केला. तसेच बुरुडगाव पाणीपुरवठा योजनेचा जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास खात्याने बुरुडगाव पाणी योजनेचा समावेश जिल्हा परिषदेच्या कृती आराखड्यात केला आहे. सदर योजनेसाठी तीन कोटी १२ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाला लवकरच सादर केला जाणार असून, पाणी योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे, अशी माहिती आमदार जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.