छप्पर जळून खाक : पिंपळगाव पिसा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:41 IST2019-04-24T18:40:43+5:302019-04-24T18:41:52+5:30
पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा ) येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाच्या छप्पराला आग लागल्याने ते जळून खाक झाले.

छप्पर जळून खाक : पिंपळगाव पिसा येथील घटना
विसापूर : पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा ) येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाच्या छप्पराला आग लागल्याने ते जळून खाक झाले.
विसापूर तलावाच्या खालच्या बाजूला टवकाऱ्या नाथ्या भोसले व कुटूंब छप्पराची वस्ती करून राहतात. ते कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका करते. मंगळवरी लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने त्यांचे कुटूंब मतदानासाठी पिंपळगाव पिसा येथे गेले होते. त्यांना घरी यायला उशीर झाला. घरी लहान मुले खेळत असताना इयत्ता सातवीत शिकणारी त्यांची नात भाग्यश्री बाबाशा काळे हिच्याकडून शेजारी असणाºया पाचटाला आग लागली. या आगीमुळे छप्पराने पेट घेतला. त्यामध्ये त्यांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून गेले. तलाठी बी. जे. कर्डिले, सहायक दिलावर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.