संगमनेरात गोवंशांची निदर्यीपणे वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST2021-05-13T04:20:11+5:302021-05-13T04:20:11+5:30

सुफियान निसार अन्सारी व लाला हाजी कुरेशी (दोघेही रा. मदिनानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांनी नावे आहेत. त्यांच्या ...

Inadvertent transport of cattle at Sangamnera | संगमनेरात गोवंशांची निदर्यीपणे वाहतूक

संगमनेरात गोवंशांची निदर्यीपणे वाहतूक

सुफियान निसार अन्सारी व लाला हाजी कुरेशी (दोघेही रा. मदिनानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांनी नावे आहेत. त्यांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉस्टेबल किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची होत असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची निदर्यतेने वाहतूक होत असलेली पिकअप (एमएच १४, सीपी ३३७८) पाठलाग करून पकडली. सुफियान अन्सारी गोवंशांची वाहतूक करताना मिळून आला. लाला कुरेशी याच्या सांगण्यावरून तो गाेवंशांची वाहतूक करत होता. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करीत आहेत.

Web Title: Inadvertent transport of cattle at Sangamnera