कोणी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान - एकनाथ शिंदे
By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 16:41 IST2023-10-26T16:31:30+5:302023-10-26T16:41:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी शिर्डी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कोणी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान - एकनाथ शिंदे
अहमदनगर - देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासोबत असून, कोणी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी शिर्डी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताला यशाचा परिस आहे. म्हणून त्यांना विकास कामांच्या निमित्ताने महाराष्ट्रात बोलवत असतो. परंतु, काहींच्या पोटात दुखते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. देशात सन २०१९ मध्ये सर्वजण एकत्र आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही एकत्र येत असले तरी एकही मोदी सबको भारी, असेही शिंदे यावेळी म्हणाले.