कोेरोना महामारीत योगोपचाराला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:00+5:302021-06-25T04:16:00+5:30

कोरोना महामारी अजून आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळलेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश भाजपच्या आवाहनानुसार ...

The importance of yoga therapy in the Corona epidemic | कोेरोना महामारीत योगोपचाराला महत्त्व

कोेरोना महामारीत योगोपचाराला महत्त्व

कोरोना महामारी अजून आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियम पाळलेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश भाजपच्या आवाहनानुसार कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. त्याचा प्रातिनिधीक प्रारंभ कुंभारी येथे झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पुरातन महादेव मंदिर देवस्थानचे राघवेश्वर महाराज होते. प्रारंभी भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सोपान पानगव्हाणे, शिवाजी कदम, राजेंद्र कोळपे, विजय कदम, दीपक चौधरी, सुनील कदम उपस्थित होते. परिसरातील नागरिकांना कोल्हे यांनी योगोपचाराचे प्रात्याक्षिके करून दाखविली.

पंतप्रधान मोदी यांनी अतिशय संयम दाखवत योगसाधनेतून महामारीला कसे दूर ठेवायचे, याचे मार्गदर्शन दिले. सर्वांचे जीवन धावपळीचे आहे. त्यात अन्य व्यायामाबरोबरच योगोपचार पद्धती गरज बनली आहे. त्यामुळे योगोपचार सर्वांनी केला पाहिजे, असे आवाहन कोल्हे यांनी केले. विजय कदम यांनी आभार मानले.

------

फोटो ओळी : स्नेहलता कोल्हे

भाजपच्यावतीने आयोजित योगदिनी प्रात्यक्षिक दाखविताना प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे.

-------------

Web Title: The importance of yoga therapy in the Corona epidemic