जवखेडे खालसा लंके प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:43+5:302021-09-19T04:22:43+5:30
तिसगाव : जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) येथील आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन सातव्या दिवशी झाले. विधिवत महाभिषेक, महाआरती व ...

जवखेडे खालसा लंके प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन
तिसगाव : जवखेडे खालसा (ता.पाथर्डी) येथील आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन सातव्या दिवशी झाले.
विधिवत महाभिषेक, महाआरती व नंतर मिरवणूकही काढण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, भाजप तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या हस्ते पूजाविधी झाले. विसर्जन मिरवणुकीत गोकुळ दौंड, पुणे शहरातील पोलीस अधिकारी बालाजी पोंधे यांनी ढोल, ताशा वाजवून रंगत आणली. वृद्धा नदी किनारी विसर्जन करण्यात आले. लंके प्रतिष्ठानचे कार्यवाह पहिलवान अमोल गवळी, वसंत कुसळकर यांनी उत्सव काळात महामारीचे निर्बंध पाळून सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविले. उपसरपंच भास्करराव नेहुल, राहुल तळेकर, अब्बास शेख, अकिल सय्यद, राजेंद्र भोसले, अविनाश मतकर, शिवाजी भोसले, इंद्रजित वाघ, प्रसाद गवळी आदींसह सहभागी झाले होते.