पत्रकाराची हत्या करणाऱ्या आरोपींचा तत्काळ शोध घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:12+5:302021-04-09T04:22:12+5:30
राहुरी : येथील पत्रकार रोहिदास राधुजी दातीर यांचे अपहरण करून हत्या केलेल्या आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शासन ...

पत्रकाराची हत्या करणाऱ्या आरोपींचा तत्काळ शोध घ्या
राहुरी : येथील पत्रकार रोहिदास राधुजी दातीर यांचे अपहरण करून हत्या केलेल्या आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे, अशा मागणीचे निवेदन राहुरी तालुका पत्रकार मित्र संघाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
येथील दक्ष झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार रोहिदास राधुजी दातीर यांचे भरदिवसा मल्हारवाडी रस्त्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना राहुरी शहरात घडली. ही फारच गंभीर बाब असून भरदिवसा पत्रकारांच्याच हत्या घडत असतील हे निंदनीय आहे. पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच गुन्हेगार असे अपहरण करून खून करत आहेत. पोलीस प्रशासनाने या घटनेतील आरोपींना तत्काळ शोधून कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी पत्रकार निसार सय्यद, भाऊसाहेब पटेकर, मनोज साळवे, विनीत धसाळ, शरद पाचारणे, रियाज देशमुख, बाळासाहेब कांबळे, रमेश बोरूडे, मीनाष पटेकर, सतीश फुलसौंदर, गणेश विघे, सुहास जाधव, शिवाजी धाडगे, विजय भोसले, आकाश येवले आदी पत्रकार उपस्थित होते.