रमेश गोंदकर यांनी नुकतीच मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यातील विषेशत: शिर्डी परिसरात वाढत्या कोरोना रुग्णांबाबत त्यांचे लक्ष वेधले.
साईबाबा संस्थानने कोरोना रुग्णांसाठी मोठी अद्ययावत इमारत उपलब्ध करून दिली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि उपचारी काही उपलब्ध आहेत. मात्र, साईसंस्थानला काही मर्यादा आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने साईसंस्थानच्या कोविड सेंटरमध्ये आवश्यक व्हेंटिलेटर, औषधसाठा आणि वैद्यकीय टिम उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
रमेश गोंदकर यांनी केलेल्या सूचनांची राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेतली असून, शिर्डीत साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याबाबतची सूचना टोपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिडीर्तील विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली असून, शिर्डीतील गुन्हेगारी संपविण्यासाठी आपण लवकरच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे आश्वासन मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्याला दिल्याचे गोंदकर यांनी सांगितले.