निरक्षर व्यक्तीने स्वखर्चातून उभारले वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:50 IST2017-10-02T13:48:29+5:302017-10-02T13:50:20+5:30
निरक्षरतेमुळे यांच्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला अनंत अडचणीला तोंड द्यावे लागते. यापासून बोध घेऊन आपल्या गावातील साक्षर व्यक्तीच्या ज्ञानात भर पडावी म्हणून एका जाणकार निरक्षराने गेल्या आठवड्यापासून गावात स्वखर्चाने वाचनालय सुरू केले आहे.

निरक्षर व्यक्तीने स्वखर्चातून उभारले वाचनालय
खासेराव साबळे/
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव माळवी(अहमदनगर) : निरक्षरतेमुळे यांच्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला अनंत अडचणीला तोंड द्यावे लागते. यापासून बोध घेऊन आपल्या गावातील साक्षर व्यक्तीच्या ज्ञानात भर पडावी म्हणून एका जाणकार निरक्षराने गेल्या आठवड्यापासून गावात स्वखर्चाने वाचनालय सुरू केले आहे.
नगर तालुक्यातील गड मांजरसुंबा येथील इंद्रभान मोहन कदम हे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. ते स्वत: निरक्षर आहेत. परंतु त्यांनी गावातील साक्षर ज्येष्ठ नागरिक, युवकांसाठी स्वखर्चाने वाचन मोफत वाचनालय सुरू केले. गावात त्यांची स्वत:ची जागा होती. त्या जागेचा उपयोग त्याने वाचनालयासाठी केला. स्वत: स्वखर्चाने दहा खुर्चा, टेबल फॅन, विविध वर्तमानपत्रे, नियतकालीक, पुस्तकांची व्यवस्था त्यांनी केली. याचा फायदा गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व युवक घेत आहेत. स्वत: निरक्षर राहिल्याची खंत त्यांना नेहमीच वाटत होती, परंतु त्याची भरपाई त्यांनी गावात मोफत वाचनालय सुरू करून केली आहे.
मी अडाणी राहिलो याचे दु:ख होते, परंतु वाचनालय सुरू करून मला फार मोठा आनंद मिळत आहे.
-इंद्रभान कदम.
गावातील ज्येष्ठ नागरिकांना वाचनालयाचा फार फायदा होत आहे. नियमित वर्तमानपत्र वाचनाने आमच्या ज्ञानात भर पडत आहे. आम्हाला बसण्यासाठी हक्काची जागा निर्माण केली आहे. युवकांनाही याचा फायदा होत आहे. -दत्तात्रय कदम, ज्येष्ठ नागरिक.
...