बेकायदेशीर तलवार बाळगणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 11:19 IST2019-02-19T11:19:32+5:302019-02-19T11:19:56+5:30

बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे.

Illegal swords | बेकायदेशीर तलवार बाळगणारे जेरबंद

बेकायदेशीर तलवार बाळगणारे जेरबंद

अहमदनगर : बेकायदेशीरपणे तलवार बाळगणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. गणेश बन्सी पडळकर(वय-४२, रा. नाथनगर, पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहिते (वय-१९, रा.रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय-४२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, सुरज वाबळे, भागीनाथ पंचमुख, मल्लिकार्जून बनकर, दिगंबर कारखेले, योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर हे पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी पाथर्डी येथील कोरडगाव चौक येथे काही लोक धारदार तलवार घेऊन थांबले असल्याची पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. तात्काळ पोलीसांनी चौकात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली असता हे लोक पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करुन तिघांनाही ताब्यात घेतले. यावेळी राजू भोसल यांच्याकडे तलवार आढळून आली. ही तलवार विक्रीसाठी आणल्याचे गणेश पडळकर, दादासाहेब मोहिते यांनी सांगितले. तिघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Illegal swords