अनिता पिंपळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:30+5:302021-09-10T04:28:30+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील नवनागापूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षिका अनिता रामभाऊ पिंपळे सुरसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ...

अनिता पिंपळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील नवनागापूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षिका अनिता रामभाऊ पिंपळे सुरसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त ‘ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व आमदार संग्राम जगताप यांच्या हसते पिंपळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, ज्ञानदेव पांडुळे, संजय सपकाळ, नंदकुमार हंबर्डे आदी उपस्थित होते. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बबनराव डांगरे, खजिनदार सुनंदा डोंगरे, सचिव हृषिकेश डोंगरे, मुख्याध्यापक सुनंदा शिंदे व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
080921\2557img_20210908_133508.jpg
स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील शिक्षिका अनिता पिंपळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार संग्राम जगताप व सहसंचालक शिक्षण दिनकर टेमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला